टीम इंडियाची भिंत समजला जाणाऱ्या चेतेश्वर पुजाराचा (Cheteshwar Pujara) खराब फॉर्म कायम आहे. लॉर्ड्स टेस्टमधील (India vs England, 2nd Test) पहिल्या इनिंगमध्ये पुजारा फक्त 9 रन काढून आऊट झाला. पुजाराला जेम्स अँडरसननं आऊट केलं. अँडरसनचा बाहेर जाणारा बॉल खेळण्याचा पुजाराचा प्रयत्न फसला. स्लिपमध्ये उभ्या असलेल्या बेअरस्टोनं त्याचा कॅच पकडला. (फोटो : AP)