IND vs AUS : 4 जानेवारीपर्यंत सिडनीला जाणार नाही टीम इंडिया
भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातली चार टेस्ट मॅचची सीरिज रोमांचक स्थितीमध्ये पोहोचली. पण या सीरिजवर आता कोरोनाचं संकट ओढावलं आहे. त्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मोठा निर्णय घेतला आहे.


भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातली चार टेस्ट मॅचची सीरिज रोमांचक स्थितीमध्ये पोहोचली. आहे. दोन्ही टीमने सीरिजची 1-1 मॅच जिंकली आहे. पण या सीरिजवर आता कोरोनाचं संकट ओढावलं आहे. त्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मोठा निर्णय घेतला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या टीम पुढचे काही दिवस मेलबर्नमध्येच थांबणार आहेत. 7 जानेवारीपासून सिडनी टेस्टला सुरूवात होणार आहे. या मॅचच्या 3 दिवस आधी दोन्ही टीम तिकडे पोहोचतील. (Photo- AP)


दरवेळी दोन्ही टीम नवीन वर्षाच्या पहिल्या रात्री सिडनीला पोहोचतात. पण सिडनी शहरात कोरोना संक्रमणाचे नवे रुग्ण आढळत असल्यामुळे खेळाडू आणि अधिकारी मेलबर्नमध्येच राहणार आहेत. (Photo- AP)


क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्या कार्यकारी अधिकारी निक हॉकली म्हणाले, 'मंगळवारी रात्रीच तिसरी टेस्ट सिडनीमध्ये होईल, हे स्पष्ट झालं. खेळाडू काही दिवस मेलबर्नमध्ये राहतील. टेस्ट सुरू व्हायचा काही दिवस आधी ते सिडनीला पोहोचतील.' (Photo- AP)