

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये टीम इंडिया (India vs Australia) चा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने नवा रेकॉर्ड केला आहे. टॉससाठी बाहेर येताच विराट 250 वी वनडे खेळाणारा खेळाडू ठरला. या मॅचमध्ये विराटने टीममध्ये कोणताही बदल केलेला नाही. (Virat Kohli/AP)


250 किंवा त्यापेक्षा जास्त वनडे खेळलेला विराट आठवा भारतीय खेळाडू ठरला आहे. याआधी सचिन तेंडुलकर (463), एमएस धोनी (347), राहुल द्रविड (340), मोहम्मद अजहरुद्दीन (334), सौरव गांगुली (308) यांनी हा रेकॉर्ड केला होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर याच्या नावावर सर्वाधिक मॅच खेळण्याचा विक्रम आहे. (Sachin Tendulkar/Instagram)


भारताला दोनवेळा विश्वविजेता बनवणाऱ्या धोनीने भारतासाठी सर्वाधिक 200 मॅचमध्ये नेतृत्व केलं आहे. धोनीने भारताकडून खेळताना 347 वनडे मॅच खेळल्या आणि 110 मॅच जिंकल्या. (MS Dhoni/Instagram)