IND vs AUS : सचिनचा विक्रम मोडण्यासापासून विराट काही पावलं दूर
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये टीम इंडिया (India vs Australia) चा पराभव झाला आहे. आता कॅनबेरामध्ये होणाऱ्या तिसऱ्या आणि अखेरच्या वनडेमध्ये विराट (Virat Kohli)ची टीम व्हाईट वॉश टाळण्यासाठी मैदानात उतरत आहे.


ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये टीम इंडियाचा पराभव झाला आहे. आता कॅनबेरामध्ये होणाऱ्या तिसऱ्या आणि अखेरच्या वनडेमध्ये विराटची टीम व्हाईट वॉश टाळण्यासाठी मैदानात उतरत आहे. या सीरिजची पहिली वनडे टीमने 66 रनने आणि दुसरी वनडे 51 रनने गमावली.


या मॅचमध्ये भारताचं लक्ष्य व्हाईट वॉशपासून वाचणं हे असलं तरी विराट कोहलीसमोर सचिन तेंडुलकरचा एक विक्रम मोडण्याची संधी आहे. कॅनबेरा वनडेमध्ये विराट वनडेमध्ये सगळ्यात जलद 12 हजार रन पूर्ण करणारा खेळाडू ठरू शकतो.


सध्या हा विक्रम सचिनच्या नावावर आहे आणि विराटला हा विक्रम मोडण्यासाठी फक्त 23 रनची गरज आहे. तेंडुलकरने 309 वनडेच्या 300 इनिंगमध्ये 12 हजार रन पूर्ण केले होते. तर कोहलीने 250 वनडेमध्येच 11,977 रन केले आहेत.


जर कोहलीने बुधवारी 23 रन जास्त केले, तर तो सचिनच्या तुलनेत 58 मॅच आधीच हा विक्रम मोडेल. (Photo- BCCI)