भारताबाहेर चौथ्या इनिंगमध्ये 50 पेक्षा जास्त रनची ओपनिंग पार्टनरशीप टीम इंडियाने याआधी 2006 साली केली होती. वेस्ट इंडिजविरुद्ध वसीम जाफर आणि सेहवाग यांच्यात 109 रनची पार्टनरशीप झाली होती. आशिया खंडाबाहेर दोन्ही इनिंगमध्ये 50 पेक्षा जास्त रन करण्याची भारताची ही आठवी वेळ आहे. याआधी 2018 साली ट्रेन्ट ब्रिज टेस्टमध्ये इंग्लंडविरुद्ध शिखर धवन आणि केएल राहुल यांच्यात दोन्ही इनिंगमध्ये 50 रनची पार्टनरशीप झाली होती.
टेस्टच्या दोन्ही इनिंगमध्ये रोहित आणि गिलने 20 पेक्षा जास्त ओव्हर बॅटिंग केली. याआधी सेहवाग आणि गंभीर या जोडीने पाकिस्तानविरुद्ध 2004-05 साली 23.2 ओव्हर आणि 23.4 ओव्हर बॅटिंग केली होती. होती. पहिल्या इनिंगमध्ये गिल 50 रन करून तर रोहित 26 रनवर आऊट झाला. दुसऱ्या इनिंगमध्ये गिलने 31 आणि रोहितने अर्धशतक केलं.