भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीची तिसरी टेस्ट मॅच सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर 7 जानेवारीपासून सुरू होणार आहे. या मॅचआधी टीम इंडियाचा कर्णधार अजिंक्य रहाणे आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी खेळपट्टीची पाहणी केली. खेळपट्टी पाहिल्यानंतरच अंतिम-11 मध्ये कोणाला संधी द्यायची याचा निर्णय घेण्यात येणार आहे. उमेश यादव सीरिजमधून बाहेर झाल्यानंतर टीम इंडियाला तिसऱ्या फास्ट बॉलरबाबत निर्णय घ्यावा लागणार आहे. (PIC: AP)
खराब हवामानामुळे मंगळवारी खेळपट्टीला झाकून ठेवण्यात आलं होतं. वातावरण ढगाळ राहिलं आणि खेळपट्टीमध्ये ओलावा असेल, तर शार्दुल ठाकूरच्या खेळण्याची शक्यता वाढेल, तर दुसरीकडे पाटा खेळपट्टी असेल, तर नवदीप सैनीला संधी मिळू शकते. कारण नवदीप सैनी जलद बॉलिंगसह जुन्या बॉलने रिव्हर्स स्विंगही करू शकतो. (PIC: AP)
'सिडनीमध्ये हवामान प्रत्येक वर्षी खूप वेगळं असतं. दोन्ही टीमना गवताचा फायदा मिळावा, यासाठी आम्ही प्रयत्न करू. तीन वर्षांपूर्वी जेव्हा इंग्लंड या मैदानात खेळली होती, तेव्हा तापमान 30 डिग्री होतं आणि गरम हवाही सुरू होती. पण यावर्षीचा मोसम वेगळा आहे,' अशी प्रतिक्रिया ऍडम लुईस यांनी दिली. (BCCI/Twitter)