ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या टेस्ट सीरिजमध्ये भारताने ऐतिहासिक कामगिरी केली. 4 टेस्ट मॅचच्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये भारताचा 2-1 ने विजय झाला. विराट कोहलीच्या अनुपस्थितीमध्ये अजिंक्य रहाणेने सर्वोत्कृष्ठ कामगिरी करत इतिहास घडवला. हा यशस्वी दौरा आटपून परत आल्यानंतर अजिंक्य रहाणेच्या बिल्डिंगमध्येही जल्लोष करण्यात आला.