

ब्रिस्बेन टेस्टमध्ये सुंदर आणि नटराजन यांनी प्रत्येकी 3 विकेट घेत ऑस्ट्रेलियाच्या बॅटिंगचे कंबरडे मोडले. या दोघांच्या शानदार बॉलिंगमुळे ऑस्ट्रेलिया संघ पहिल्या इनिंगमध्ये 369 रनवर ऑल आऊट झाला.


ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (Ind vs Aus) ब्रिस्बेन टेस्टमध्ये पदार्पण करणाऱ्या टी. नटराजन (T Natrajan ) आणि वॉशिंग्टन सुंदर(Washington Sunder) यांनी पहिल्या इनिंगमध्ये शानदार कामगिरी करत विकेट घेतल्या आहेत. या मॅचमध्ये दोघांनी मिळून सहा विकेट घेतल्या आहेत. या दोघांच्या शानदार बॉलिंगमुळे ऑस्ट्रेलिया संघ पहिल्या इनिंगमध्ये 369 रनवर ऑल आऊट झाला.


या मॅचमध्ये नटराजनने 78 रन देऊन तीन विकेट घेतल्या, तर वॉशिंग्टन सुंदरने 89 रन देत 3 विकेट मिळवल्या. महत्त्वाचे म्हणजे 72 वर्षानंतर या दोघांनी खास रेकॉर्ड केलं आहे.


नटराजन आणि सुंदर हे दोघं टेस्टच्या एका इनिंगमध्ये तीन विकेट घेणाऱ्या खेळाडूंच्या क्लबमध्ये सामील झाले आहेत. भारताकडून टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या या दोघांनी त्यांच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यात पहिल्या इनिंगमध्ये प्रत्येकी 3-3 विकेट घेतल्या आहेत हा विक्रम आहे.