Change Language
होम » फ़ोटो गैलरी » बातम्या
1/ 5


भारताचा ओपनर शिखर धवन (Shikhar Dhawan) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठीच्या भारतीय टीममध्ये नाही. त्यामुळे वनडे आणि टी-20 सीरिज संपल्यानंतर तो भारतात परतला आहे.
2/ 5


शनिवारी धवनने दीपक चहर आणि युझवेंद्र चहलसोबतचा विमानातला एक फोटो सोशल मीडियावर शेयर केला. या फोटोवर एका युजरने धवनला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. (Photo AP)
3/ 5


या कमेंटनंतर शिखर धवनही गप्प बसला नाही आणि त्याने ट्रोल करणाऱ्याची बोलती बंद केली. धवनने चहर आणि चहलसोबतचा फोटो शेयर करताना, डोळे काढून गोट्या खेळतो, असं कॅप्शन दिलं होतं.
4/ 5


शिखर धवनच्या या कमेंटवर ट्रोलरने घाणेरडी कमेंट केली. यावर धवनने त्याला चांगलंच सुनावलं. तुझ्या घरातले, पण तुझ्याबद्दल हेच बोलतात, असं प्रत्युत्तर धवनने ट्रोलरला दिलं.