आता रविंद्र जडेजा यालाही पहिली टेस्ट मॅच मुकावी लागण्याची शक्यता आहे. पहिल्या टी-20 मॅचदरम्यान जडेजाच्या डोक्याला दुखापत (कनकशन) झाली होती, याचसोबत त्याच्या मांसपेशींनाही दुखापत झाली आहे. त्याला कमीत कमी तीन आठवडे क्रिकेटपासून लांब राहावं लागू शकतं. त्यामुळे जडेजाला त्याची 50वी टेस्ट खेळण्यासाठी आणखी वाट पाहावी लागू शकते. (PIC: AP)
मांडीच्या स्नायूची दुखापत गंभीर असेल, तर त्याला मेलबर्नमध्ये होणाऱ्या दुसऱ्या टेस्टलाही मुकावं लागू शकतं. आयसीसी कनकशन प्रोटोकॉलनुसार डोक्याला दुखापत झाली तर खेळाडूला सात ते 10 दिवस आराम दिला जातो. त्यामुळे 11 डिसेंबरपासून सुरू होणारा दुसरा सराव सामनाही जडेजा खेळू शकणार नाही, असं बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितलं. (PIC: AP)
भारत ए आणि ऑस्ट्रेलिया ए यांच्यातल्या पहिल्या अभ्यास मॅचवेळी कॉमेंट्री करताना एक कॉमेंटेटर म्हणाला, जडेजा कनकशनमुळे ती आठवडे बाहेर असेल, तर दुसरीकडे बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितलं की तो कनकशनच्या दुखापतीतून सावरत आहे, पण मांसपेशीची दुखापत ठीक व्हायला वेळ लागू शकतो. जडेजा खेळत नसल्यामुळे अश्विन भारतीय टीमचा स्पिनर असेल. अश्विनने सराव सामन्यात चांगली कामगिरी केली आहे. (PIC: AP)