

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्येही टीम इंडिया (India vs Australia) च्या बॉलरनी खराब कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलियाने या मॅचमध्ये 50 ओव्हर खेळून 389-4 एवढा मोठा स्कोअर केला आहे. ऑस्ट्रेलियाच्या सुरुवातीच्या पाचही बॅट्समननी अर्धशतकाच्यावर खेळी केल्या. वॉर्नर आणि फिंच यांच्या ओपनिंग जोडीने ऑस्ट्रेलियाला 142 रनची दणदणीत सुरुवात करून दिली. (PHOTO-BCCI)


टीम इंडियाच्या बॉलरनी पावरप्लेमध्ये एकही विकेट न घेता 59 रन दिले. लागोपाठ पाचव्यांदा वनडेमध्ये टीम इंडियाला पावरप्लेमध्ये एकही विकेट घेता आली नाही. याआधी पहिल्या वनडेमध्ये भारताने एकही विकेट न घेता 51 रन दिले होते. (PHOTO-BCCI)


माऊंट मांगनुईमध्ये न्यूझीलंडविरुद्ध भारतीय बॉलरनी एकही विकेट न घेता 65 रन दिले होते. (Photo- Instagram)


ऑकलंडमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्याच वनडेमध्ये भारताला पावरप्लेमध्ये 52 रन देऊन एकही विकेट मिळवता आली नव्हती.