

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारताचा (India vs Australia) दारूण पराभव झाला, पण या मॅचमध्ये ओपनर मयंक अगरवाल (Mayank Agarwal) याने नवा विक्रम केला. मयंक दोन्ही इनिंगमध्ये अपयशी ठरला असला, तरी त्याने स्वत:च्या नावावर रेकॉर्ड केलं आहे.(BCCI/Twitter)


मयंकने ऍडलेड टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये 17 रन आणि दुसऱ्या इनिंगमध्ये 9 रन केले, याचसोबत टेस्ट क्रिकेटमध्ये सगळ्यात जलद 1 हजार रन करणारा तो तिसरा भारतीय ठरला. (Photo- Mayank Agarwal Instagram)


मयंकने 19 इनिंगमध्ये एक हजार रनचा टप्पा ओलांडला. याचसोबत त्याने सुनिल गावसकर यांनाही मागे टाकलं.


सुनिल गावसकर यांनी 21 इनिंगमध्ये एक हजार रन पूर्ण केले होते. टेस्ट क्रिकेटमध्ये सगळ्यात जलद एक हजार रन पूर्ण करण्याचा विक्रम विनोद कांबळीच्या नावावर आहे. विनोद कांबळीने 14 इनिंगमध्येच एक हजार रन केले होते.