Change Language
होम » फ़ोटो गैलरी » बातम्या
1/ 4


ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 मध्ये भारताचा (India vs Australia) 12 रनने पराभव झाला, त्यामुळे विराटचं ऑस्ट्रेलियाला व्हाईटवॉश करण्याचं स्वप्न भंगलं. याआधी पहिल्या टी-20 मध्ये भारताचा 11 रनने आणि दुसऱ्या टी-20 मध्ये 6 विकेटने विजय झाला.
2/ 4


टी-20 क्रिकेटमधला भारताचा मागच्या 12 मॅचमधला हा पहिलाच पराभव होता. याआधी मागच्यावर्षी डिसेंबर महिन्यात भारताला वेस्ट इंडिजविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता.
3/ 4


तर घराबाहेर भारताचा 11 टी-20 मॅचनंतरचा हा पहिला पराभव होता. याआधी फेब्रुवारी 2019 साली भारताचा न्यूझीलंडविरुद्ध हॅमिल्टनमध्ये पराभव झाला होता.