

संपूर्ण भारतात शनिवारी दिवाळी धुमधडाक्यात साजरी केली जाईल. पण यावेळी भारतीय टीम दिवाळीमध्ये ऑस्ट्रेलियात आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय टीम सिडनीमध्ये पोहोचली आहे.


नेहमीच्या परिस्थितीमध्ये भारतीय टीम जेव्हा परदेश दौऱ्यावर असते, तेव्हा भारतीय उच्चायुक्तालयात त्यांना रात्रीच्या जेवणासाठी बोलावलं जातं. पण यावेळी कोरोनामुळे टीम इंडिया सिडनीच्या आपल्या हॉटेलमध्येच राहणार आहे.


टीम इंडियाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय टीम प्रशासन हॉटेलमध्येच दिवाळीचा छोटा कार्यक्रम करणार आहे. या कार्यक्रमात खेळाडू दिवाळी साजरी करतील. अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, रविंद्र जडेजा आपल्या कुटुंबासोबत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेले आहेत, त्यामुळे त्यांचं कुटुंबही या कार्यक्रमात सहभागी होईल. (BCCI Twitter)


भारत आणि ऑस्ट्रेलियातल्या सीरिजची सुरुवाक वनडे मॅचपासून होईल. 27 नोव्हेंबरला पहिली वनडे मॅच खेळवली जाईल. तर 17 डिसेंबरपासून टेस्ट सीरिजला सुरुवात होईल. पहिली टेस्ट ऍडलेडमध्ये डे-नाईट असेल. तर दुसरी टेस्ट 26 डिसेंबर, तिसरी टेस्ट 7 जानेवारी आणि चौथी टेस्ट 15 जानेवारीपासून सुरू होईल. (BCCI Twitter)