IND vs AUS : धोनीनंतर हा विक्रम करणारा रहाणे दुसरा कर्णधार
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्टनंतर (India vs Australia) टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) पितृत्वाच्या रजेवर गेला. त्यामुळे अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) कडे टीमचं नेतृत्व देण्यात आलं.


ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्टनंतर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली पितृत्वाच्या रजेवर गेला. त्यामुळे अजिंक्य रहाणेकडे टीमचं नेतृत्व देण्यात आलं. यानंतर बॉक्सिंग डे टेस्टमध्ये भारताचा दणदणीत विजय झाला. याचसोबत रहाणेने त्याच्या नावावर खास रेकॉर्ड केला. (PIC: AP)


रहाणे एमएस धोनीनंतर कर्णधार म्हणून आपल्या पहिल्या तिन्ही मॅच जिंकणारा दुसरा कर्णधार बनला. (PIC: AP)


मेलबर्नमधल्या बॉक्सिंग डे टेस्टमध्ये भारताचा 8 विकेटने विजय झाला. याआधी अजिंक्यच्या नेतृत्वात भारताचा 2016-17 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध धर्मशाला टेस्टमध्ये 8 विकेटने आणि 2018 साली अफगाणिस्तानविरुद्ध बंगळुरूमध्ये इनिंग आणि 262 रनने भारताचा विजय झाला.


रहाणेच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय टीमने या टेस्टमध्ये दमदार कामगिरी केली. भारतीय बॉलरनी ऑस्ट्रेलियाला पहिल्या इनिंगमध्ये 195 रनवर रोखलं. यानंतर अजिंक्य रहाणेने शतक करत भारताला 326 रनपर्यंत पोहोचवलं. रविंद्र जडेजाची ऑल राऊंड कामगिरी, तसंच जसप्रीत बुमराह, अश्विन, मोहम्मद सिराज यांच्या भेदक बॉलिंगपुढे कांगारूंनी लोटांगण घातलं. (PIC : AP)