Change Language
होम » फ़ोटो गैलरी » बातम्या
IND vs AUS : रहाणे, बुमराह, अश्विनला मेलबर्न टेस्टच्या विजयाचा फायदा
मेलबर्न टेस्टमध्ये अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात टीम इंडियाचा (India vs Australia) 8 विकेटने शानदार विजय झाला. रहाणेची शतकी खेळी, तसंच जसप्रीत बुमराह आणि अश्विनच्या भेदक बॉलिंगमुळे भारताने कांगारूंना लोळवलं.
1/ 4


मेलबर्न टेस्टमध्ये अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात टीम इंडियाचा 8 विकेटने शानदार विजय झाला. रहाणेची शतकी खेळी, तसंच जसप्रीत बुमराह आणि अश्विनच्या भेदक बॉलिंगमुळे भारताने कांगारूंना लोळवलं. या तीन खेळाडूंच्या कामगिरीमुळे आयसीसी क्रमवारीमध्येही फायदा झाला आहे. (Photo AP)
2/ 4


बॉक्सिंग डे टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये 112 रन करणारा रहाणे आयसीसीच्या टेस्ट बॅट्समनच्या क्रमवारीमध्ये सहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे.
3/ 4


आर. अश्विन बॉलरच्या यादीमध्ये 7व्या क्रमांकावर पोहोचला आहे. बॉलरच्या क्रमवारीत टॉप-10 मध्ये फास्ट बॉलरचा दबदबा आहे. या यादीमध्ये अश्विन हा एकमेव स्पिनर आहे. मेलबर्न टेस्टमध्ये त्याने 5 विकेट घेतल्या होत्या.