भारतीय क्रिकेटपटूंच्या पत्नी आणि गर्लफ्रेंड कायमच चर्चेत असतात. खेळाडू त्यांच्या गर्लफ्रेंडसोबतचे रॉमँटिक फोटो नेहमीच सोशल मीडियावर शेयर करत असतात. भारताचा फास्ट बॉलर नवदीप सैनीही या यादीत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नाव कमावण्याआधीच नवदीप सैनीची गर्लफ्रेंड आहे, पण त्याने ट्रोलिंगमुळे गर्लफ्रेंडसोबतचे फोटो सोशल मीडियावरून हटवले आहेत. पण सैनीचे पूजा बिजारनियासोबतच काही जुने फोटो आहेत.नवदीप सैनीने मागच्या वर्षी व्हॅलन्टाईन डेच्या दिवशी गर्लफ्रेंड पूजा बिजारनियाला प्रपोज केलं होतं, पण यानंतर त्याचं खूप ट्रोलिंग करण्यात आलं, त्यामुळे सैनी आता गर्लफ्रेंडसोबतचे फोटो शेयर करत नाही. बहुतेकवेळा क्रिकेटपटूंच्या गर्लफ्रेंड बॉलीवूड किंवा मॉडेलिंग क्षेत्रातल्या असतात, पण सैनीची गर्लफ्रेंड एका कंपनीत काम करते. (Navdeep Saini/Instagram)