

भारतीय ‘अ’ संघानं पहिल्याच एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाचा धुव्वा उडवला. चहलच्या पाच विकेटसह भारतानं 69 धावांनी आफ्रिकेवर विजय मिळवला.


या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय फलंदाजांची चांगली सुरुवात केली. त्यानंतर शिवम दुबे आणि अक्सर पटेल यांनी शतकी भागिदारी करत भारताला 327चा आकडा पार करून दिला.


आफ्रिकेविरोधात उभारून आलेला शिवम दुबेची सोशल मीडियावर भविष्यातला युवराज सिंग अशी तुलना होत आहे.


याचं कारण म्हणजे दुबेनं गेल्या वर्षी रणजी चषकमध्ये एकाच सामन्या त 5 षटकार लगावले होते. या त्याच्या आक्रमक खेळीमुळे त्याला आयपीएल 2019मध्ये बंगळूरू संघानं तब्बल 5 कोटी रुपयांना विकत घेतले होते.


मात्र आयपीएलमध्ये दुबेला चांगली कामगिरी करता आली नाही. त्यानं 4 सामन्यात केवळ 40 धावा केल्या. तर, लिस्ट एमध्ये 23 सामन्यात त्याला एकही अर्धशतक लगावता आले नाही.


त्यामुळं दुबेसाठी हा सामना महत्त्वाचा होता. त्यानं या सामन्यात पुरेपूर फायदा घेत 6 षटकार आणि 3 चौकार लगावत 60 चेंडूत 79 धावा केल्या.