भारताने श्रीलंकेविरुद्ध घरच्या मैदानात तिन्ही फॉरमॅटमध्ये 58 मॅच जिंकल्या आहेत. जर दोन्ही टेस्टमध्ये विजय मिळाला तर टीम इंडिया घरच्या मैदानात श्रीलंकेविरुद्ध सर्वाधिक मॅच जिंकणारी टीम बनेल. सध्या हे रेकॉर्ड ऑस्ट्रेलियाच्या नावावर आहे. ऑस्ट्रेलियाने घरच्या मैदानात श्रीलंकेचा तिन्ही फॉरमॅटमध्ये मिळून 59 सामन्यांमध्ये पराभव केला आहे.
ऑफ स्पिनर आर.अश्विन याच्या नावावर टेस्ट क्रिकेटमध्ये 430 विकेट झाल्या आहेत. भारताकडून टेस्टमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूंमध्ये अश्विन तिसऱ्या क्रमांकावर आहे. जर या सीरिजमध्ये अश्विनने 5 विकेट घेतल्या तर तो कपिल देव (Kapil Dev) यांचं 434 विकेटचं रेकॉर्ड मोडेल आणि दुसऱ्या क्रमांकावर जाईल. भारताकडून टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम अनिल कुंबळेच्या नावावर आहे. कुंबळेने टेस्टमध्ये 619 विकेट घेतल्या आहेत. (BCCI Twitter)