टीम इंडिया या सीरिजमध्ये 2-1 ने आघाडीवर आहे, त्यामुळे त्यांच्याकडे सीरिज जिंकण्याची चांगली संधी आहे. शेवटची मॅच जिंकली तर त्याचा टीमला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या पॉईंट्स टेबलमध्येही फायदा होईल. ही मॅच जिंकल्यास टीम इंडियाचे 60 टक्के पॉईंट्स होतील. ऑस्ट्रेलियाची टीम 78 टक्क्यांसह पहिल्या क्रमांकावर आहे.