इंग्लंडविरुद्धच्या अखेरच्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघात हार्दिक पांड्या यांचंही नाव सामील आहे. मात्र, संघ जाहीर होण्यापूर्वीच हार्दिक पांड्याने कसून सराव केला आहे. पांड्याने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून काही फोटोज शेअर केले आहेत, ज्यामध्ये तो शर्टलेस होऊन मैदानावर सराव करताना दिसतो आहे. (Hardik Pandya/Twitter)
भारत आणि इंग्लंड यांच्यातील शेवटचे दोन कसोटी सामने अहमदाबाद येथील मोटेरा स्टेडियममध्ये खेळवले जाणार आहेत. तिसरा कसोटी सामना डे-नाईट असेल, जो गुलाबी चेंडूने खेळला जाईल. याआधी भारताने बांग्लादेशविरुद्ध 2019 मध्ये कोलकाता येथे गुलाबी चेंडून कसोटी सामना खेळला होता. ज्यामध्ये टीम इंडिया विजयी झाली होती. (Hardik Pandya/Twitter)
तिसरा कसोटी सामना डे-नाईट असल्याने हार्दिक पांड्याचा अष्टपैलू खेळाडू म्हणून संघात समावेश केला जाऊ शकतो. दुसऱ्या कसोटी सामन्यानंतर त्यानेही गुलाबी चेंडूने नेटमध्ये फलंदाजीचा सराव केला आहे. याशिवाय तो मैदानातही जोरदार घाम गाळताना दिसत आहे. यावेळी तो गोलंदाजी करताना मात्र दिसला नाही. (Hardik Pandya/Twitter)