कर्णधार म्हणून रोहित शर्माची कामगिरी चांगली झाली आहे. नवा कर्णधार झाल्यानंतर त्याच्या नेतृत्वाखाली भारताने आतापर्यंत एकही मालिका गमावलेली नाही आणि सलग 6 मालिकाही जिंकल्या आहेत. भारत आणि इंग्लंड (Ind vs Eng) यांच्यातील 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना उद्या खेळवला जाणार आहे. मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. (एएफपी)
टीम इंडियाने टी-20 मालिकेत इंग्लंडचा पराभव केला. त्यामुळे भारतीय संघाचा उत्साह वाढला आहे, पण हा सामना मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर होणार आहे. येथे आतापर्यंत इंग्लिश संघाचा वरचष्मा राहिला आहे. या दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 4 वनडे सामने इथं झाले आहेत. यजमानांनी यापैकी 3 मध्ये विजय मिळवला आहे. भारतीय संघाने केवळ एकच सामना जिंकला आहे. (भारतीय क्रिकेट संघ इन्स्टाग्राम)
टीम इंडियाने 1983 मध्ये इथं इंग्लंडचा 6 विकेटने पराभव केला होता. विश्वचषकाची उपांत्य फेरी होती, त्यानंतर भारतीय संघ चॅम्पियनही झाला. या सामन्यात प्रथम खेळताना इंग्लंडने 213 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाने 4 गडी गमावून हे लक्ष्य गाठलं. मोहिंदर अमरनाथने 2 विकेट घेण्याव्यतिरिक्त 46 धावा केल्या आणि त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं होतं. (फोटो क्रेडिट्स - @icc)
यानंतर या मैदानावर दोन्ही संघ 3 वेळा आमनेसामने आले आहेत आणि प्रत्येक वेळी इंग्लंडने विजय मिळवला आहे. 1986 मध्ये खेळलेला सामना इंग्लिश संघाने 5 गडी राखून जिंकला होता. यानंतर 1996 मध्ये 4 गडी राखून आणि 2007 मध्ये 3 विकेटने विजय मिळवला होता. आता 15 वर्षांनंतर पुन्हा दोन्ही संघ इथं आमनेसामने आले आहेत. (एपी)