नवी दिल्ली, 01 जानेवारी: नवीन वर्षाचा पहिला दिवस टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज उमेश यादवसाठी गुड न्युज घेऊन आला आहे. कारण उमेश यादव शुक्रवारी पापा झाले आहेत. त्याची पत्नी तान्या वाधवा हिने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. उमेश यादव वडील झाल्याची बातमी बीसीसीआयने आपल्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केली आहे. पण या बातमीनंतर बीसीसीआय आणि कर्णधार विराट कोहली ट्रोल होऊ लागले आहेत.
पोटरीमध्ये दुखापत झाल्यामुळे उमेश यादव ऑस्ट्रेलिया दौर्यातून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी टी नटराजनला कसोटी संघात संधी मिळाली आहे. मुलीच्या जन्मावेळी उमेश यादव आपल्या पत्नीबरोबर नव्हता, परंतु विराट कोहलीनं आपल्या बाळाच्या जन्मापूर्वीच सुट्टी घेतली आहे. सध्या विराट अनुष्का शर्माबरोबर सुट्टी घालवत आहे. यामुळेच चाहत्यांनी त्याला ट्रोल केलं आहे. (फोटो- बीसीसीआय)
माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनीही विराट कोहलीच्या पितृत्व रजेबाबत प्रश्नचिन्ह उभे केले होते. आयपीएलच्या काळातच टी नटराजन वडील बनले होत, असेही ते म्हणाले. परंतु टीम इंडियानं कसोटी संघातील निव्वळ गोलंदाज म्हणून त्याला आतापर्यंत थांबवलं आहे. पण आता त्याला भारतीय कसोटी संघात स्थान मिळालं आहे. (साभार- टी नटराजन इंस्टाग्राम)