इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये टीम इंडियाची (India vs England Third Test) बॅटिंग गडगडली. मॅचच्या पहिल्याच ओव्हरमध्ये जेम्स अंडरसनने (James Anderson) केएल राहुलला (KL Rahul) शून्य रनवर आऊट केलं.
2/ 10
राहुलची विकेट गेल्यानंतर चेतेश्वर पुजाराही (Cheteshwar Pujara) लवकर पॅव्हेलियनमध्ये परतला. 1 रन करून अंडरसननेच पुजाराचीही विकेट घेतली. पुजारा माघारी गेला तेव्हा भारताचा स्कोअर 4/2 एवढा होता.
3/ 10
जेम्स अंडरसनने भारताला लागोपाठ तिसरा धक्का दिला. विराट कोहली (Virat Kohli) 7 रनवर आऊट झाला तेव्हा भारताचा स्कोअर 21/3 एवढा होता.
4/ 10
रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) यांनी भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण लंचच्या आधी रहाणेने बाहेरचा बॉल मारण्याचा प्रयत्न केला. ओली रॉबिनसनच्या बॉलिंगवर जॉस बटलरने रहाणेचा कॅच पकडला. रहाणेच्या विकेटनंतर भारताची अवस्था 56/4 अशी झाली.
5/ 10
सुरुवातीचे बॅट्समन लवकर आऊट झाल्यानंतर भारताला ऋषभ पंतकडून (Rishabh Pant) अपेक्षा होती, पण तोदेखील स्वस्तात आऊट झाला. 9 बॉलमध्ये 2 रन करून पंतला माघारी जावं लागलं.
6/ 10
ऋषभ पंतनंतर रोहित शर्मादेखील (Rohit Sharma) आऊट झाला. क्रेग ओव्हरटनने रोहितची विकेट घेतली. रोहितने 105 बॉलमध्ये 19 रन केले. रोहितच्या विकेटनंतर भारताची अवस्था 67/6 अशी झाली.
7/ 10
लॉर्ड्स टेस्टमध्ये अर्धशतक करणारा मोहम्मद शमी (Mohammad Shami) पहिल्याच बॉलला आऊट झाला.
8/ 10
सॅम करनच्या बॉलिंगवर रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) एलबीडब्ल्यू आऊट झाला. डीआरएसचा निर्णयही रविंद्र जडेजाला वाचवू शकला नाही. 4 रन करून जडेडा आऊट झाला.
9/ 10
शमीची विकेट घेतल्यानंतर पुढच्याच बॉलला करनने बुमराहलाही (Jasprit Bumrah) शून्य रनवर आऊट केलं, त्यामुळे भारताची अवस्था 67/9 अशी झाली. 67 रनवरच भारताने आपल्या 4 विकेट गमावल्या.
10/ 10
11 व्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या मोहम्मद सिराजने (Mohammad Siraj) फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला, पण त्याल 10 बॉलमध्ये 3 रन करता आले, त्यामुळे भारताचा 78 रनवर ऑल आऊट झाला.