

30 मे पासून आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धा इंग्लंडमध्ये रंगणार आहे. यात सहभागी होणारा संघ जो चषक जिंकण्यासाठी खेळतो त्याचा इतिहास मोठा रंजक आहे.


1975 पासून 1996 पर्यंत 6 स्पर्धांपर्यंत आय़सीसी वर्ल्ड कप म्हटलं जात नव्हतं. तर त्याऐवजी जी कंपनी प्रायोजक होती त्यांचे नाव वर्ल्ड कपला दिलं जायचं. यामुळे सहा वर्ल्ड कपची नावे आणि चषक वेगवेगळे होते.


इंग्लंडमध्ये खेळण्यात आलेल्या 1999 च्या वर्ल्ड कपपासून चषक नव्या रुपात समोर आला. त्यानंतर आयसीसी चषक असे म्हटले जाऊ लागले तसेच तो एकाच आकारात आणि डिझाईनमध्ये राहिला.


आय़सीसी चषक सोने आणि चांदीपासून तयार केला जातो. याशिवाय लाकडाचाही वापर केला जातो. या चषकाची उंची 60 सेंटीमीटर तर वजन 11 किलो इतकं असते.


ज्या चषकासाठी संघ स्पर्धेत खेळतात ती जिंकल्यानंतर खरा चषक दिला जात नाही. विजेत्या संघाला आय़सीसी चषकाची प्रतिकृती दिली जाते. खरा चषक दुबईतील मुख्यालयात ठेवण्यात आला आहे.


आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कपच्या इतिहासात सर्वात महागडा चषक रिलायन्सच्या प्रायोजकत्वाने खेळण्यात आलेल्या स्पर्धेत देण्यात आला होता. 1987 मध्ये रिलायन्स चषक जयपुरमध्ये करण्यात आला होता. तो जगातील सर्वात महागडा सोन्याचा चषक मानला जातो.