भारत आणि पाकिस्तान 24 ऑक्टोबरला आपल्या टी-20 वर्ल्ड कप 2021 च्या मोहिमेला सुरुवात करणार आहेत. दोन वर्षांनंतर या टीम एकमेकांसमोर उभ्या ठाकणार आहेत. तणावपूर्ण संबंधांमुळे भारत आणि पाकिस्तान फक्त आयसीसी स्पर्धा आशिया कपमध्ये एकमेकांविरुद्ध खेळतात. भारताने टी-20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानवर 5-0 ने आघाडी मिळवली आहे. यावेळीही टीम इंडियाचं ही मॅच जिंकण्यासाठी फेवरेट आहे. या सामन्याआधी दोन्ही टीममधल्या सर्वाधिक रन करणाऱ्या खेळाडूंवर नजर टाकूया. (Virat kohli/Babar Azam Instagram)
विराट कोहली : भारताचा स्टार खेळाडू विराट कोहलीने (Virat Kohli) फक्त टी-20 वर्ल्ड कपच्या 6 सामन्यांमध्ये 254 रन केल्या आहेत. विराटची सरासरी 84.66 ची तर त्याच्या नावावर दोन अर्धशतकं आहेत. कोहलीचा स्ट्राईक रेट 118.69 चा आहे. विराटने पाकिस्तानविरुद्ध टी-20 वर्ल्ड कपमध्ये मॅच जिंकवणाऱ्या खेळी केल्या आहेत. यावेळी पहिल्यांदाच विराट टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे.
शोएब मलिक : पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिक (Shoaib Malik) 8 मॅचमध्ये 164 रनसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. शोएब मलिकने फक्त 103.79 च्या स्ट्राईक रेटने रन केले, तसंच त्याची सरासरी 27.33 ची आहे. मलिकने भारताविरुद्ध एक अर्धशतकही केलं. 2007 साली टी-20 वर्ल्ड कपच्या दोन्ही सामन्यांमध्ये पाकिस्तानचा भारताविरुद्ध पराभव झाला होता, तेव्हा शोएब मलिक पाकिस्तानचा कर्णधार होता.
गौतम गंभीर : गौतम गंभीरने (Gautam Gambhir) पाकिस्तानविरुद्ध 139 रन केले, त्याची सरासरी 27.80 ची आहे, तसंच त्याने एक अर्धशतकही केलं. गंभीरचं हे अर्धशतक 2007 टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये आलं होतं. गंभीरने 54 बॉलमध्ये 75 रन केले होते, त्यामुळे भारताने 157/5 पर्यंत मजल मारली होती. भारताने हा सामना 5 रनने जिंकला होता.