

ICC Cricket World Cupमध्ये न्यूझीलंडकडून भारताला पराभवचा झटका बसला. साखळी सामन्यात पहिल्या क्रमांकावर असलेला संघ सेमीफायनलमध्ये पराभूत झाला. याचबरोबर भारतीय संघाचे आव्हान संपुष्टात आले आहे.


भारताचे आव्हान संपुष्टात आल्यानंतर भारतीय संघ तब्बल आठ आठवड्यानंतर मायदेशी परतणार आहेत. मात्र विराट कोहली आपली पत्नी अनुष्का शर्मासह इंग्लंडमध्ये काही काळ थांबणार आहे.


दरम्यान मॅंचेस्टरमध्ये ज्या हॉटेलध्ये भारतीय संघ वास्तव्यास होता. तेथून विराट कोहली बाहेर पडताना त्याच्या आजूबाजूला चाहत्यांची गर्दी झाली होती. पराभवानंतरही चाहते कोहलीकडे सेल्फीची मागणी करत होते.


यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये प्रत्येक सामन्यात कोहलीनं अर्धशतकी खेळी केली. मात्र सेमीफायनलच्या महत्त्वाच्या सामन्यात कोहली केवळ 1 धावा करत बाद झाला.


वर्ल्ड कपचे स्वप्न भंगल्यामुळं कोहली काहिसा निराश होता. दरम्यान कोहलीला आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यात विश्रांती दिली जाऊ शकते.