

ICC Cricket World Cupमध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघानं सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. तर, बांगलादेशला नमवत भारतानं त्यांना स्पर्धेबाहेर केले आहे. पण बांगलादेशचा संघ हा एकमेव संघ नाही तर भारतानं यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये चार संघांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे.


सगळ्यातआधी भारतानं अफगाणिस्तानला नमवत सेमीफायनलमधून बाहेर केले होते. अफगाणिस्ताननं आतापर्यंत एकूण 8 सामने खेळले आहेत मात्र त्यांना एकाही सामन्यात विजय मिळवता आलेला नाही. भारतानं अफगाणिस्तानविरुद्धचा सामना 11 धावांनी जिंकला होता.


अफगाणिस्तानला नमवल्यानंतर भारतीय संघानं टार्गेट केले ते वेस्ट इंडिजला. एकतर्फी सामन्यात कॅरिबयन संघाला पराभूत करून भारतानं हा सामना तब्बल 125 धावांनी जिंकला आणि त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला. वेस्ट इंडिजनं 8 सामन्यांपैकी 1 सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळं ते वर्ल्ड कप बाहेर गेले आहेत.


दरम्यान एकमेव अपराजित संघ म्हणून भारतीय संघ वर्ल्ड कपमध्ये मिरवत असतानाच इंग्लंडनं भारताला मोठा दणका दिला. मात्र तरी इंग्लंडनं सेमीफायनलमध्ये प्रवेश केलेला नाही. मात्र भारतानं या सामन्यात पराभूत होतं, पाकिस्तानच्या आशाही जवळजवळ धुळीस मिळवल्या आहेत. त्यामुळं इंग्लंड की पाकिस्तान चौथे तिकीट कोणाला मिळणार हे आज न्यूझीलंड-इंग्लंड यांच्या सामन्यानंतर कळेल.


अफगाणिस्तान, वेस्ट इंडिज यांच्यापाठोपाठ भारतानं बांगलादेशला घरचा रस्ता दाखवला आहे. भारताविरुद्ध पराभव मिळवत बांगलादेशचे आव्हान संपुष्टात आले आहे. बांगलादेशनं आतापर्यंत सात सामन्यात 7 गुण मिळवले आहेत. आता त्यांचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. अफगाणिस्तान, वेस्ट इंडिज यांच्यापाठोपाठ भारतानं बांगलादेशला घरचा रस्ता दाखवला आहे. भारताविरुद्ध पराभव मिळवत बांगलादेशचे आव्हान संपुष्टात आले आहे. बांगलादेशनं आतापर्यंत सात सामन्यात 7 गुण मिळवले आहेत. आता त्यांचा सामना पाकिस्तानशी होणार आहे.