

इंग्लंड आणि वेल्समध्ये होणाऱ्या विश्वचषकाला केवळ 4 दिवस उरले असताना. यात वेस्ट इंडिजचा संघ पुर्ण जोशात खेळण्यासाठी उतरणार आहे. मात्र वेस्ट इंडिजच्या संघात ओशाने थॉमस या खेळाडूला यंदा संधी देण्यात आली आहे.


जमैकाचा हा जलद गोलंदाज 140-145 किमीच्या गतीनं गोलंदाजी करतो. मात्र त्याला संघात स्थान मिळवण्यासाठी खुप मेहनत करावी लागली. क्रिकेटचे प्रशिक्षण घेत असतानाच त्याच्या डोळ्यांदेखत त्याच्या भावाला गोळी घालण्यात आली, या दु:खातून सावरत त्यानं आपल्या गोलंदाजीवर लक्ष केंद्रित केले.


ओशाने थॉमसचे चार भाऊ आहेत, थॉमस 11 वर्षांचा असताना त्याच्या डोळ्यादेखत 20 वर्षांच्या भावाची हत्या करण्यात आली. त्यानंतर स्वत:ला सावरत त्यानं गोलंदाजी प्रशिक्षणावर भर दिला.


एवढेच नाही तर, क्रिकेटच्या प्रशिक्षणादरम्यना गुंडांनी त्याला लुबाडले. यातूनही तो सावरला आणि त्यानं कैरेबियन प्रीमियर लीगमध्ये चांगली कामगिरी केली. फायनलच्या सामन्यात त्यानं दिग्गज फलंदाज ख्रिस गेलला बाद करत, आपल्या संघाला विजेतेपद मिळवून दिले.


आयपीएलमध्येही थॉमसला राजस्थान संघानं विकत घेतले होते. यात कोलकाता विरुद्धच्या सामन्यात त्यानं रसेलला आऊट केले होते. थॉमसच्या मते, तेव्हा जो फलंदाजांच्या डोळ्यात भिती बघतो तेव्हा त्याला आपल्यासोबत घडलेल्या वाईट प्रसंगांची आठवण येते. आणि तो आणखी तेजीनं गोलंदाजी करतो.