

आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये भारताला मोठा धक्का बसला असून सलामीवीर शिखर धवन दुखापतीने खेळण्याची शक्यता कमी झाली आहे. आता त्याच्या जागी संघात कोणाची वर्णी लागणार याची चर्चा सुरू आहे.


शिखर धवनच्या जागी रिषभ पंतच्या नावाला अनेकांची पसंती आहे. त्याची वर्ल्ड कपच्या संघात निवड न झाल्याने रिकी पाँटिंगसह अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. त्यामुळे त्याला संधी दिली जाऊ शकते. सध्या भारतीय संघात दोन यष्टीरक्षक आहेत त्यामुळे रिषभचे नाव मागे पडू शकते.


आयपीएलमध्ये रिषभ पंत ज्या संघातून खेळला त्या दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार श्रेयस अय्यरच्या नावाचाही विचार होऊ शकतो. आघाडीच्या फळीत खेळण्यासाठी अय्यरचा विचार केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.


धवनच्या जागी अंबाती रायडुच्या नावाचीसुद्धा चर्चा पुन्हा एकदा होऊ लागली आहे. अंबाती रायडु मधल्या फळीत खेळणारा फलंदाज असून अनेकदा संघाला त्याने अडचणीतून बाहेर काढलं आहे.


आयपीएलमध्ये जबरदस्त कामगिरी केलेल्या मनीष पांडेसुद्धा या यादीमध्ये आहे. मनीष पांडे सातव्या क्रमांकावर जबरदस्त फलंदाजी करतो.


पदार्पणाच्या कसोटीत शतक करणारा पृथ्वी शॉ सलामीचा फलंदाज आहे. त्यानेही फलंदाजीत चमक दाखवली आहे. जर सलामीच्या फलंदाजाच्या जागी सलामीला खेळणाऱ्या फलंदाजाचा विचार केल्यास पृथ्वी शॉचे नाव पुढे येऊ शकते.


आयपीएलमध्ये आपल्या फलंदाजीची चुणूक दाखवलेल्या मंयक अग्रवालला चौथ्या क्रमांकाचा दावेदार मानलं जात होतं. जर शिखर धवनच्या जागी केएल राहुल सलामीला खेळवला तर पुन्हा चौथ्या क्रमांकावर कोण असा प्रश्न निर्माण होऊ शकतो.