Change Language
होम » फ़ोटो गैलरी » बातम्या
1/ 5


इंग्लंडमध्ये 30 मे पासून आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेचा महासंग्राम सुरु होणार आहे. यात जिंकणाऱ्या संघाला आयसीसी 40 लाख डॉलर इतकी रक्कम देणार आहे.
2/ 5


भारतीय चलनानुसार विजेत्या संघाला 28 कोटी रुपये देण्यात येणार आहेत. वर्ल्ड कपच्या इतिहासात विजेत्या संघाला देण्यात येणारी ही सर्वात मोठी रक्कम ठरणार आहे.
3/ 5


वर्ल्ड कप स्पर्धा 46 दिवस रंगणार आहे. यात विजेत्या संघाला 40 लाख डॉलर तर उपविजेत्या संघाला 20 लाख डॉलर बक्षीस दिले जाणार आहे. सेमीफायनलला पोहचणाऱ्या संघांना 8 लाख डॉलर बक्षीस मिळणार आहे.
4/ 5


वर्ल्ड कपच्या साखळी फेरीत जिंकणाऱ्या संघाला 40 हजार डॉलर तर साखळी फेरीतून बाद फेरीत पोहचणाऱ्या संघाला एक लाख डॉलरचे बक्षीस दिले जाणार आहे.