

अनेजण काही गोष्टी आपल्यासाठी लकी मानतात. त्या गोष्टींशिवाय एखाद्या कामाला सुरुवात करत नाहीत. भारताच्या क्रिकेट संघात असे काही खेळाडू आहेत जे मैदानात उतरण्यापूर्वी लकी वस्तू सोबत ठेवायचे. तर नेहमीप्रमाणे विशिष्ट कृती करून सामन्यासाठी तयार व्हायचे.


भारताचा माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर फलंदाजीला मैदानात उतरण्यापूर्वी डाव्या पायाला पहिल्यांदा पॅड बांधत असे. तसेच आपल्या किट बॅगमध्ये साईबाबांचा फोटोसुद्धा ठेवायचा.


कर्णधार विराट कोहली सुरुवातीला त्याचे आवडते ग्लोव्हज घालून फलंदाजीला यायचा. त्यानंतर मनगटावर पट्टी बांधून खेळायला लागला. आता त्याने हातात कडे घालून खेळण्यास सुरुवात केली आहे. या कड्याला तो लकी मानतो.


भारताला दुसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकून देणारा धोनी 7 नंबर लकी मानतो. त्याच्या जर्सीचा नंबर 7 असून त्याचा वाढदिवस 7 जुलैला असतो.


धोनीप्रमाणे युवराज सिंगसुद्धा 12 नंबर लकी मानतो. याच नंबरची जर्सी घालून तो खेळतो. त्याचा वाढदिवस 12 डिसेंबरला असतो.


भारताचा वेगवान गोलंदाज जहीर खान सामना खेळताना खिशात पिवळ्या रंगाचा रुमाल ठेवायचा. या पिवळ्या रंगाच्या रुमालला जहीर खान लकी मानत असे.


भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग सुरुवातीला 44 नंबरची जर्सी घालायचा. पण त्याचा फारसा परिणाम होत नाही म्हणून त्याने बिना नंबरची जर्सी घालण्यास सुरुवात केली.