वर्ल्ड कप स्पर्धेत सहभागी सर्व संघाचे कर्णधार एकमेकांना भेटले तेव्हा त्यांनी इतर संघातील एखादा तरी खेळाडू निवडला मात्र एका कर्णधाराने कोणताच बदल केला नाही.
आय़सीसी क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेला 30 मे पासून इंग्लंडमध्ये सुरुवात होणार आहे. स्पर्धेला सुरुवात होण्याच्या आधी सर्व सहभागी संघांचे कर्णधार एकत्र आले होते. यावेळी त्यांनी एकमेकांशी संवाद साधला.
2/ 9
कर्णधारांच्या संवादावेळी प्रत्येकाला प्रतिस्पर्धी संघातील एक खेळाडू निवडण्यास सांगण्यात आलं होतं. त्यावेळी भारताचा कर्णधार विराट कोहली म्हणाला की कोणा एकाला निवडणं कठीण आहे. एबी निवृत्त झाला आहे त्यामुळे मी फाफ डु प्लेसीला संघात घेईन.
3/ 9
दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डु प्लेसीने इंग्लंडमध्ये गोलंदाज महत्त्वाचे ठरणार आहेत. यासाठी भारताचा गोलंदाज जसप्रीत बुमराहला निवडलं. याशिवाय राशिद खान आणि पेंट कमिन्स यांनाही संघात घेण्याची इच्छा असल्याचं फाफ डु प्लेसीने सांगितलं.
4/ 9
बांगलादेशचा कर्णधार मशरेफ मुर्तजानं थेट भारताच्या कर्णधारालाच संघात घ्यायचं असल्याचं म्हटलं.
5/ 9
विराट कोहलीप्रमाणे न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सननेसुद्धा फाफ डु प्लेसीला संघात घेईन असं म्हटलं. तर गोलंदाज म्हणून राशिद खानला संघात घ्यायला आवडेल असं केनने सांगितलं.
6/ 9
पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमदने इंग्लंडचा फलंदाज जोस बटलरला आपल्या संघात निवडलं.
7/ 9
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरॉन फिंचने दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कासिगो रबाडाला घेण्याची इच्छा दर्शवली.
8/ 9
श्रीलंकेचा कर्णधार दिमुथ करूणारत्नेनं बेन स्टोक्सला आपल्या संघात निवडलं.
9/ 9
जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गनने आपल्या संघात कोणताच बदल करायचा नाही असं सांगितलं. मात्र, रिकी पाँटिंगला प्रशिक्षक म्हणून घेण्याची इच्छा आहे असं म्हटलं.