

दर चार वर्षांनी होणाऱ्या किक्रेट वर्ल्ड कपचा महासंग्राम यंदा इंग्लंडमध्ये 30 मे पासून सुरु होणार आहे. याबाबत क्रिकेट जगतात अनेक चर्चा रंगत आहेत. यामध्ये दिग्गज खेळाडूही कोणता देश जिंकणार, कोण खेळाडू संघात घ्यायला पाहिजे किंवा नको याबद्दल मत व्यक्त करत आहेत.


दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला आहे. मात्र, एका मुलाखती वेळी त्याने आपण यंदा नाही तर 2023 च्या वर्ल्ड कपमध्ये खेळेन असं म्हटलं आहे.


2023 च्या वर्ल्ड कपमध्ये खेळण्याबद्दल डिव्हिलियर्सने एक अट ठेवली आहे. तो म्हणाला की, जर भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी 2023 मध्ये खेळणार असेल तर मीसुद्धा नक्की खेळेन.


सध्या डिव्हिलियर्सचे वय 35 वर्ष आहे. तर महेंद्रसिंग धोनी 37 वर्षांचा आहे. 2019 चा वर्ल्ड कप धोनीचा शेवटचा असेल. एबी डिव्हिलियर्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून गेल्या वर्षी निवृत्ती घेतली आहे.