क्रिकेटर Hardik Pandya ने आपल्या कुटुंबीयांसह साजरा केला Christmas, पाहा PHOTOS
Hardik Pandya Christmas Celebration : भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने कुटुंबासोबत ख्रिसमस साजरा केला आहे. त्यानं इन्स्टाग्रामवर सेलिब्रेशनचे अनेक फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तो कुटुंब आणि मित्रांसोबत हा सण साजरा करताना दिसत आहे. त्याने इन्स्टाग्राम स्टोरीवर दोन फोटोही शेअर केले आहेत. त्यात त्याच्या घरातली सजावट दिसत आहे.
हार्दिक पांड्या सध्या त्याच्या फिटनेसमुळं क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. परंतु त्यानं आपल्या कुटुंबासोबत ख्रिसमस साजरा केला आहे. पांड्यानं या सेलिब्रेशनचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
2/ 6
त्यानं शेयर केलेल्या फोटोंमध्ये तो तो मोठा भाऊ कृणाल पंड्या, वहिनी आणि पत्नी नताशा स्टॅनकोविकसह दिसत आहे.
3/ 6
त्यानं इन्स्टाग्राम स्टोरीत शेयर केलेल्या 2 फोटोंमध्ये दिसत आहे की त्यानं ख्रिसमसनिमित्त घराची आकर्षक सजावट केलेली आहे.
4/ 6
हार्दिकच्या क्रिकेट कारकिर्दीसाठी हे वर्ष काही खास राहिलेलं नाही. 2021 च्या आयपीएलमध्ये आणि टी-20 विश्वचषकात तो फ्लॉप ठरला होता.
5/ 6
हार्दिकला मुंबईने आयपीएल 2022 साठीही रिटेन केलेलं नाही. सध्या तो खराब फिटनेसशी झुंज देत आहे. अशा स्थितीत तो पुढील 2 महिने मैदानात परतू शकणार नसल्याचं मानलं जात आहे.
6/ 6
त्याच्या खराब कामगिरीचा आणि खराब फिटनेसचा आयपीएल 2022 च्या मेगा लिलावातील त्याच्या बोलीवरही परिणाम होणार आहे.