चेन्नई सुपरकिंग्सचा कर्णधार एमएस धोनीने (MS Dhoni) आपल्या सहकारी क्रिकेटपटूंनाही नवी हेयरस्टाईल करण्यासाठी प्रभावित केलं आहे. मुंबई इंडियन्सचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्यानेही धोनीच्या पावलावर पाऊल ठेवलं आहे. हार्दिकनेही धोनीप्रमाणेच हेयर स्टायलिस्ट आलिम हकीमकडून आपली नवी हेयर स्टाईल करून घेतली आहे. आलिम हकीमनेच मागच्या महिन्यात धोनीचा लूक बदलला होता. (Hardik Pandya/Instagram)
हार्दिकची पत्नी नताशा स्टेनकोविकनेही त्याच्या या नव्या लूकचं कौतुक केलं. तिने आग आणि बदामाची इमोजी कमेंटमध्ये पोस्ट केली. श्रीलंकेतल्या खराब कामगिरीनंतर मुंबई इंडियन्स हार्दिककडून धमाकेदार कामगिरीची अपेक्षा करत असेल. आयपीएल 2021 च्या दुसऱ्या सत्राचा पहिला सामना मुंबई आणि चेन्नई यांच्यात होणार आहे. (Hardik Pandya/Instagram)