होम » फ़ोटो गैलरी » बातम्या
1/ 4


टीम इंडियाचे ऑलराऊंडर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि कृणाल पांड्या (Krunal Pandya) यांच्या वडिलांचं शनिवारी निधन झालं. हृदयविकाराचा धक्का लागल्यामुळे हिमांशू पांड्या (Himanshu Pandya) यांचा मृत्यू झाला. बडोद्यामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
2/ 4


शनिवारीच हिमांशू पांड्या यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले, तेव्हा दोन्ही पांड्या बंधूंना अश्रू अनावर झाले. मोठा भाऊ असल्यामुळे कृणाल पांड्या याने सगळे विधी केले.
3/ 4


वडिलांच्या अचानक जाण्यामुळे हार्दिक आणि कृणाल यांनाही मोठा धक्का बसला आहे. त्यांना शेवटचा निरोप देताना दोघंही भावुक झाले.