आयपीएल ही जगातली सगळ्यात मोठी क्रिकेट लीग आहे, यात कोणताही वाद नाही. अनेक सेलिब्रिटींसह युवा खेळाडूंना आयपीएलमध्ये त्याची प्रतिभा दाखवण्याची संधी मिळते. क्रिकेट आणि बॉलीवूड आयपीएलमुळे एकत्र येताना चाहत्यांना पाहायला मिळतं. 2008 पासून सुरू झालेल्या आयपीएलमध्ये अनेकवेळा वादही पाहायला मिळाले. आयपीएलच्या 13 मोसमांमध्ये झालेल्या वादांवर नजर टाकूयात (Harbhajan, Dhoni, Anushka/Instagram)
अनुष्का-गावसकर वाद : आयपीएलच्या मागच्या मोसमात कॉमेंट्री करताना गावसकर यांनी केलेल्या वक्तव्यावरूनही वाद निर्माण झाला होता. विराट कोहलीच्या खराब फॉर्मवर बोलताना गावसकर म्हणाले, 'विराटने लॉकडाऊनमध्ये अनुष्काच्या बॉलिंगचा सामना केला आहे', यामुळे बराच वाद निर्माण झाला होता. अनुष्काने गावसकर यांचं हे वक्तव्य अपमानकारक असल्याची प्रतिक्रिया दिली, यानंतर गावसकरांना स्पष्टीकरणही द्यावं लागलं.