

महान फलंदाज आणि भारतरत्न सचिन तेंडुलकर याचा आज 47वा वाढदिवस. सचिनच्या विक्रमांबद्दल, धावांबद्दल आपण सर्वच जाणतो. पण सचिनच्या खाजगी आयुष्याबद्दल जास्त बोललं गेलं नाही. पण सचिनचं नाव एका अभिनेत्रीसोबत जोडलं गेलं होतं.


एका जमान्यात सचिन हा देशातल्या मोस्ट इलिजिबल बॅचलर होता. त्याच्या लग्नाबाबत अनेक चर्चा रंगायच्या. 1993-94मध्ये सचिनची लोकप्रियता त्याच्या विक्रमांसारखी वाढतच होती. तेव्हा पहिल्यांदा सचिनचं नाव अभिनेत्री शिल्पा शिरोडकर हिच्याशी जोडलं गेलं.


दोघंही मराठी असल्यामुळं त्याच्या लग्नाच्या चर्चाही रंगल्या होत्या. मात्र त्यानंतर सचिननं याबाबत स्पष्टीकरण देत, या सगळ्या चुकीच्या असल्याचं स्पष्ट केलं होतं. एवढचं नाही तर सचिननं मी शिल्पाला ओळखतही नाही अशी कबुली दिली.


सचिन आणि शिल्पा यांचं बिनसल्यानंतर, सचिनच्या लग्नाच्या चर्चा मीडियामध्ये रंगू लागल्या. सचिनच बालपण ज्या साहित्य सहवासमध्ये गेलं तिथल्याच एका मुलीशी सचिनच्या लग्नाच्या चर्चा सुरु झाल्या होत्या.


मात्र, सचिननं त्या सगळ्या अफवा खोडून काढल्या. त्यानंतर अचानक एकदिवशी सचिननं आपण लग्न करत असल्याचे जाहीर केलं. सचिननं अंजली मेहता हिच्याशी लग्न करणार असल्याचं सांगितलं. अंजली आणि सचिन यांची लव्हस्टोरी सर्वांनाच माहित आहे. अंजली सचिनपेक्षा पाच वर्षांनी मोठी आहे. दोघ तीन वर्ष एकत्र येतं.