

भारतीय क्रिकेट संघाचं भविष्य म्हणून पाहिल्या जाणाऱ्या पृथ्वी शॉचा (Prithvi Shaw) आज वाढदिवस. 21 वर्षाच्या पृथ्वीनं वयाच्या 18व्या वर्षी भारतीय संघाकडून पदार्पणातच शतकी खेळी होती. सध्या सुरू असेलल्या आयपीएलमध्ये पृथ्वीला विशेष चांगली कामगिरी करता आली नाही आहे.


दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणाऱ्या पृथ्वीला या हंगामात चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळे रविवारी हैदराबादविरुद्ध झालेल्या क्वालिफायर-2 सामन्यात पृथ्वीला डच्चू देण्यात आला.


पृथ्वी शॉ जेवढा मैदानावर आपल्या शानदार खेळीनं गोलंदाजांना रडवतो तेवढाच तो मैदानाबाहेर मस्तीखोरही आहे. मात्र आता पृथ्वीच्या अशा एका मजेदार व्हिडीओवरून त्याच्या वैयक्तिक आयुष्याचा खुलासा झाला आहे. पृथ्वी शॉ कोणाला डेट करत आहे, हे समोर आले आहे.


पृथ्वी शॉनं पोस्ट केलेल्या काही व्हिडीओवर टीव्ही अभिनेत्री प्राची सिंहच्या (Prachi Singh) कमेंट पाहायला मिळत आहे. यानंतर चाहत्यांनी पृथ्वी शॉ आणि प्राची सिंह यांच्यात काहीतरी शिजतय याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.


अभिनेत्री आणि डान्सर प्राची सिंह (Prachi Singh) आणि पृथ्वी शॉ यांची मैत्री जास्त चांगली असल्याचे या कमेंटमधून दिसत आहे.


प्राची सिंह एक मॉडेल आणि डान्सरही आहे. सोशल मीडियावर ती आपल्या बेली डान्सचे फोटो पोस्ट करत असते.