Happy Birthday Hardik Pandya : एकेकाळी बॅट घेण्यासाठी नव्हते पैसे, आज 'हा' क्रिकेटपटू वर्षाला कमवतो 30 कोटी!
Happy Birthday Hardik Pandya : टीम इंडियाचा पोस्टर बॉय आणि सर्वात यशस्वी अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या याचा आज वाढदिवस. टीम इंडियाचा सर्वात डॅशिंग खेळाडू म्हणून आज त्याची ओळख आहे.


टीम इंडियाचा पोस्टर बॉय आणि सर्वात यशस्वी अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या याचा आज वाढदिवस. टीम इंडियाचा सर्वात डॅशिंग खेळाडू म्हणून आज त्याची ओळख आहे. मात्र त्यानं अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत दिवस काढले आहेत.


11 ऑक्टोबर 1993मध्ये गुजरातमध्ये जन्माला आलेला पांड्या टीम इंडियाचा एक स्टार खेळाडू आहे. गरीब घरातून आलेल्या पांड्यानं आपल्या हिमतीवर आज श्रीमंतीचं आयुष्य जगत आहे.


मात्र, हार्दिक पांड्याचे आधीचे आयुष्य तेवढे सोपे नव्हते. टीम इंडियात स्थान मिळवण्यासाठी त्याला संघर्ष करावा लागला.हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या दोघांना क्रिकेटची आवड होती, मात्र क्रिकेट किट घेण्यासाठीही त्यांच्याकडे पैस नव्हते.


एकवेळ अशी होती जेव्हा पांड्यानं मॅगी खाऊन दिवस काढले होते. हार्दिकनं स्वत: पोस्ट करत क्रिकेट खेळण्यासाठी ट्रकनं जावे लागायचे असे सांगितले होते. परिस्थिती नसल्यामुळे हार्दिकला शिक्षण सोडावे लागले. हार्दिकनं केवळ नववी पर्यंत शिक्षण घेतले आहे.


मात्र आज त्यानं आपल्या हिमतीच्या जोरावर ही परिस्थिती बदलली. हार्दिकला बीसीसीआय 3 कोटी रुपये पगार देते. तर, 2015मध्ये मुंबई इंडियन्स संघानं हार्दिकला आपल्या संघात घेतला. 2020मध्ये हार्दिकला 11 कोटींना रिटेन करण्यात आले.


हार्दिक 2019मध्ये फॉर्ब्स सेलिब्रिटी टॉप 100 श्रीमंतांमध्ये सामिल झाला होता. 2019मध्ये हार्दिकनं 24.87 कोटी रुपयांची कमाई केली होती. हार्दिक पांड्या शानदार लाइफस्टाइलसाठी ओळखला जातो.


एवढेच नाही तर हार्दिक पांड्याकडे हिऱ्याची चेन, कोट्यावधींच्या गाड्याही आहेत. पांड्याकडे पाटेक फिलिपची पर्पेचुअल कॅलेंडर 5740/1G घड्याळ आहे. ज्याची सध्याची किंमत 85 लाख आहे. भारतात हे घड्याळ मिळत नसल्यामुळे त्याची किंमत 1 कोटी 10 लाख आहे.


तर, त्याच्याकडे क्रिसचियन लुबाउटिनचे लु स्पाइक्स शूजही आहेत. हे शूज खास ब्लॅक काफफिश लेदरमध्ये तयार केलेले असतात. यांची किंमत 70 हजार आहे मात्र आयात केल्यामुळं त्यांची किंमत 1 लाख पर्यंत जाते.


1 जानेवारी 2020मध्ये हार्दिकनं आपली गर्लफ्रेंड नताशा स्टाकोविचसोबत साखरपूडा केला. त्यानंतर लॉकडाऊनमध्येच हार्दिकनं विवाह केल्याची बातमी दिली.