टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा (Australia vs New Zealand) 8 विकेटने पराभव केला. त्यामुळे कांगारू पहिल्यांदाच टी-20 वर्ल्ड कप चॅम्पियन झाले. याआधी ऑस्ट्रेलियाने पाचवेळा वनडे वर्ल्ड कप जिंकला होता. फायनलमध्ये मिचेल मार्श आणि डेव्हिड वॉर्नर यांनी अर्धशतकं केली, तर ग्लेन मॅक्सवेल 28 रनवर नाबाद राहिला. टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर आता ग्लेन मॅक्सवेल लवकरच विनी रमणसोबत लग्न करणार आहे. यासाठी तो मार्च-एप्रिल 2022 साली होणारा ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तान दौराही टाळण्याची शक्यता आहे. (Vini Raman/Instagram)