

क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी अष्टपैलू फलंदाज म्हणून कोणाचे नाव असेल तर ते आहे गॅरी सोबर्स. एकाच डावात 365 धावांची तुफानी खेळी आणि एकाच षटकार 6 षटकार लगावण्याची किमया कोणी केली असेल तर ते होते गारफिल्ड सोबर्स.


आज सोबर्स यांनी 83व्या वर्षात पदार्पण केले. मात्र आजतागायत त्यांना बंधनात राहणे पसंत नाही. आपल्या मर्जीचा मालक, असे त्यांनी ओळख क्रिकेट जगतात आजही आहे.


रात्रभर नशेत राहणं आणि सकाळी तीच नशा मैदानावर खोऱ्यानं धावा करत उतरवणं, हा गॅरी यांचा जणू छंद होता. दारू पिऊन त्यांनी आपल्या संघाला अनेक सामने जिंकून दिले होते.


1973मध्ये लॉर्ड्सवर इंग्लंडविरोधात सुरु असलेल्या कसोटी सामन्यात पहिल्याच दिवशी 31 धावांवर नाबाद असलेल्या गॅरी यांनी रात्रभर पार्टी केली. एवढचं नाही तर सामना सुरु होण्याआधी सुध्दा ते ड्रेसिंग रूममध्ये दारू पीत होते. फलंदाजी करत असताना ब्रेक घेत त्यांनी 1-2 पेग लगावले होते, या सामन्यात त्यांनी 150 धावांची आश्चर्यकारक खेळी केली.


सर गॅरी सोबर्स यांनी डॉन ब्रॅडमन यांनी कौतुक करत सलाम केला होता. 1954मध्ये वेस्ट इंडिजकडून पदार्पण केलेल्या गॅरी यांनी 1974मध्ये निवृत्ती घोषित केली.