फ्लिपकार्टच्या ‘बिग बिलियन सेल’चा आज दुसरा आहे. या सेलद्वारे फ्लिपकार्टकडून फिटनेस बँड, स्मार्टवॉच, स्मार्टफोन, टीव्ही आणि इतरही अनेक गॅजेट्सवर मोठी सूट देण्यात येत आहे. त्यामुळे असे गॅजेट्स खरेदी करण्याच्या तयारीत असणाऱ्या ग्राहकांसाठी ही मोठी संधी आहे.यावर्षी फ्लिपकार्टने ग्राहकांसाठी अधिक पर्याय तर उपलब्ध केले आहेतच, पण ऑफर्समध्येही मोठी वाढ केली आहे. तसंच फ्लिपकार्टने या सेलसाठी HDFC बँकेसोबत पार्टनरशिप केली आहे. यामुळे क्रेडिट आणि डेबिट कार्डद्वारे खरेदी करणाऱ्या ग्राहकांना फायदा होऊ शकणार आहे.