एम एस धोनी (MS Dhoni) हा टीम इंडियाचा सगळ्यात यशस्वी कर्णधार आहे. आयसीसीच्या तीनही ट्रॉफी जिंकणारा धोनी हा एकमेव कर्णधार आहे. धोनीच्या नेतृत्वात टीम इंडियाने 2007 टी-20 वर्ल्ड कप, 2011 वर्ल्ड कप आणि 2013 चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. आयपीएलमध्येही धोनीने चेन्नई सुपरकिंग्सला (CSK) तीनवेळा चॅम्पियन बनवलं. जगातला सगळ्यात यशस्वी कर्णधार असलेला धोनी अनेक खेळाडूंना प्रेरणाही देतो. धोनीसोबत खेळलेले काही खेळाडू हे सध्या प्रशिक्षक बनले आहेत.
स्टीफन फ्लेंमिंग : न्यूझीलंडचा स्टीफन फ्लेमिंग (Stephen Fleming) हा त्याच्या काळातल्या सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक होता. पहिल्या आयपीएलमध्ये फ्लेमिंग एमएस धोनीच्या नेतृत्वात खेळला आहे. यानंतर तो चेन्नई सुपरकिंग्सचा मुख्य प्रशिक्षक झाला. आयपीएलमध्ये फ्लेमिंगने 10 मॅचमध्ये 196 रन केले, यामध्ये त्याचा सर्वाधिक स्कोअर 45 रन होता. फ्लेमिंगने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 400 मॅच खेळल्या आहेत.
मायकल हसी : मायकल हसी (Michael Hussey) चेन्नई सुपरकिंग्सचा प्रमुख बॅट्समन होता. अनेकवेळा त्याने टीमसाठी ओपनिंगही केली. हसीने चेन्नईला 2010 आणि 2011 साली चेन्नईला आयपीएल ट्रॉफी जिंकवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. हसी आता चेन्नईच्या टीमचा बॅटिंग प्रशिक्षक आहे. हसीने आयपीएलमध्ये 59 सामन्यांमध्ये 38 पेक्षा जास्तच्या सरासरीने 1977 रन केले.