निवृत्तीनंतर धोनी करणार शेती? 43 एकरच्या फार्महाऊसचे Exclusive Photos
महेंद्र सिंह धोनी (MS Dhoni) ला तुम्ही कायम क्रिकेटरच्या वेशामध्ये बघितलं आहे. पण कॅप्टन कूलच्या आतमध्ये एक शेतकरी दडला आहे. त्याच्या फार्महाऊसचे Exclusive Photos पाहून हे तुमच्या लक्षात येईलच


भारतीय क्रिकेट टीमचा माजी कप्तान महेंद्र सिंग धोनीला शेती करण्यातही रस आहे. धोनीने आपल्या फार्म हाऊसमध्ये पेरु, पपई आणि इतर मोठ-मोठी झाडं लावली आहेत. धोनी आपल्या फॉर्म हाऊसकडे विशेष लक्ष देत असतो.


धोनी जेव्हा आपल्या कुटुंबासोबत रांचीमध्ये असतो तेव्हा या फॉर्म हाऊसवर नक्की येतो. या फार्म हाऊसजवळच्या शेतामध्ये तो स्वत: शेतीही करतो. धोनीने 2 एकरामध्ये मटारची लागवड केली होती. त्याचबरोबर कोबी, बटाटा, टॉमेटो अशा भाजांची लागवडही त्याने केली होती.


धोनीचे अॅग्रीकल्चरल कन्सटंट रोशन कुमार यांनी सांगितलं की, धोनीच्या नेट हाऊसमध्ये सीडलिंग करुन रोपटी लावली जातात. त्यानंतर ही रोपटी फार्म हाऊसमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी लावली जातात.


साक्षी धोनीलासुद्धा शेतीच्या कामाची आवड आहे. ती स्वत: या सगळ्या गोष्टींमध्ये लक्ष घातले. कधीकधी ती स्वत:च्या हाताने भाज्या तोडून घरी घेऊन जाते.


शेतीसोबतच धोनीने गायीदेखील पाळल्या आहेत. त्याच्याकडे जवळपास 300 गायी आहेत. धोनी जेव्हा फार्म हाऊसवर येतो तेव्हा त्याच्या गायींसोबतही वेळ घालवतो.


फळं आणि भाज्यांसोबत धोनीच्या शेतात धान्याचीही शेती केली जाते. हे धान्य धोनीच्या शेतातलं धान्य म्हणून ओळखलं जातं.


धोनीच्या शेतात कुक्कुट पालनही केलं जाणार आहे. मध्य प्रदेशातून 2000 झाबुआ कोंबड्यांची ऑर्डर देण्यात आली आहे.


धोनीच्या फार्म हाऊसवर कडकनाथच्या कोंबड्यांचं पालन केलं जाणार आहे. या कोंबड्यांची किंमत इतर कोंबड्यांपेक्षा जास्त असते. त्याच्या सेवनामुळे हिमोग्लोबीन आणि आयर्न वाढतं. कडकनाथच्या कोंबड्यांचा रंगा काळा असतो. सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर हा कॅप्टन कूल शेतीकडे अधिक लक्ष देणार आहे.