Ashes Series : इंग्लंडच्या जो रूटने आधी सुनील गावस्करांचा तोडला रेकॉर्ड, सचिनलाही टाकलं मागे
Ashes Series : अॅशेस कसोटी मालिकेच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी जो रूटने सुनील गावस्कर आणि नंतर सचिन तेंडुलकर या दोन दिग्गज भारतीय खेळाडूंचा विक्रम मोडला आहे.
इंग्लिश कर्णधार जो रूटने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या अॅशेस कसोटीत आधी सुनील गावस्कर आणि नंतर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याने 2021 या वर्षात 1550 हून अधिक कसोटी धावा केल्या आहेत.
2/ 6
या हंगामात कोणत्याही इंग्लिश क्रिकेटरला कसोटी क्रिकेटमध्ये 500 पेक्षा जास्त धावा करता आलेल्या नाहीत. परंतु जो रूटने कसोटी क्रिकेटमध्ये चांगलं प्रदर्शन केलेलं आहे.
3/ 6
आता तो कसोटी क्रिकेटमध्ये एकाच मोसमात सर्वाधिक धावा करणाऱ्या पहिल्या 5 फलंदाजांच्या यादीत सामील झाला आहे.
4/ 6
सचिन तेंडुलकरने 2010 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये 1562 धावा केल्या होत्या, त्यानंतर जो रूटसाठी हे वर्ष चांगलंच फलदायी ठरत आहे.
5/ 6
यापूर्वी भारताच्या सुनील गावसकर यांनी 1979 या वर्षात 1549 धावा केल्या होत्या, त्यानंतर आता त्यांचा रेकॉर्ड रूटने मोडला आहे.
6/ 6
रूटने नवा रेकॉर्ड बनवल्यानंतर आता सुनिल गावस्कर आणि सचिन तेंडूलकर यांच्या स्थानांमध्ये घसरण झालेली आहे.