टेनिसपटूने इंग्लिश क्रिकेटरला केलं क्लीन बोल्ड! समुद्रामध्येच केला साखरपुडा, Photos
टी-20 वर्ल्ड कप 2021 (T20 World Cup) संपल्यानंतर काही दिवसांमध्येच इंग्लंडचा क्रिकेटपटू सॅम बिलिंग्सने (Sam Billings Engagement) त्याची गर्लफ्रेंड सारा केंटलेसोबत साखरपुडा केला आहे.
टी-20 वर्ल्ड कप 2021 संपल्यानंतर काही दिवसांमध्येच इंग्लंडचा क्रिकेटपटू सॅम बिलिंग्सने त्याची गर्लफ्रेंड सारा केंटलेसोबत साखरपुडा केला आहे. बिलिंग्स न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या टी-20 वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये इंग्लंडकडून खेळला होता. (PC-Sam Billings Instagram)
2/ 7
बिलिंग्सची होणारी बायको सारा टेनिसपटू आहे. साराने तिच्या करियरमध्ये अनेक पुरस्कार जिंकले आहेत, तसंच तिने सायकोलॉजीमध्ये ग्रॅज्युएशन केलं आहे. (PC-Sam Billings Instagram)
3/ 7
सॅम बिलिंग्स आणि सारा केंटले यांनी मालदीवला समुद्रामध्येच साखरपुडा केला.
4/ 7
बिलिंग्सने सोशल मीडियावर काही फोटो शेयर केले, यामध्ये त्याने साराला अंगठी घातली. होणारी मिसेस बी. जगातला सगळ्यात नशीबवान माणूस, असं कॅप्शन बिलिंग्सने या फोटोंना दिलं आहे.
5/ 7
टी-20 वर्ल्ड कपमध्ये बिलिंग्सला एकच मॅच खेळला, पण न्यूझीलंडविरुद्धच्या सेमी फायनलमध्ये त्याला बॅटिंगची संधी मिळाली नाही. (pc: sarah cantlay instaram )
6/ 7
टी-20 वर्ल्ड कपच्या दोन्ही सराव सामन्यांमध्ये न्यूझीलंडविरुद्ध त्याने नाबाद 27 रन केले होते, तर भारताविरुद्ध त्याला बॅटिंगची संधी मिळाली नाही.
7/ 7
बिलिंग्स इंग्लंडकडून 25 वनडे आणि 33 टी-20 मॅच खेळला आहे, त्याच्या नावावर 607 वनडे रन आणि 417 टी-20 रन आहेत.