

जगभरात लोकप्रिय असणाऱ्या क्रिकेटमध्ये जवळपास रोजच क्रिकेटचे नवे विक्रम घडत असतात आणि जुने रेकॉर्ड तुटत असतात, पण अजूनही असे काही विक्रम आहेत जे कित्येक शतकांनंतरही कायम राहिले आहेत.


1800 साली एका क्रिकेट सामन्यात एकाच बॉलमध्ये 286 रन झाल्या होत्या. साधारणपणे एका बॉलवर बॅट्समन 2 ते 3 रन पळून काढू शकतात. पण या सामन्यात दोन बॅट्समननी धावून 286 रन काढल्या होत्या. एकाच बॉलमध्ये 200 पेक्षा जास्त रन बॅट्समन कसा काय काढू शकतो, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.


लंडनमधील Pall Mall Gazette या वृत्तपत्रामध्ये ही बातमी त्यावेळी छापून आली होती. पश्चिम ऑस्ट्रलियामध्ये हा सामना खेळावला गेला होता. महत्त्वाचे म्हणजे या सामन्यात एका झाडाने महत्त्वाची भूमिका बजावली होती. 15 जानेवारी 1894 ला या वृत्तपत्रात आलेल्या बातमीनुसार व्हिक्टोरिया आणि स्क्रॅच इलेव्हन या टीममध्ये हा सामना खेळवला गेला होता.


या मॅचमध्ये व्हिक्टोरिया टीमने पहिले बॅटिंग करताना पहिलाच बॉल बॅट्समननी इतका उंच मारला असता की तो मैदानावरील झाडाच्या फांद्यांमध्ये जाऊन अडकला.


हा बॉल हवेत गेल्यानंतर खेळाडूंनी रन घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर बॉल झाडावर अडकून पडल्यानंतर देखील त्यांनी रन घेणं सुरूच ठेवलं. फिल्डिंग टीमने अंपायरला बॉल हरवला असल्याची घोषणा करण्याची विनंती केली. पण झाडावर अम्पायरला बॉल दिसत असल्याने त्यानेहा निर्णय फेटाळला.


यावेळी एका खेळाडूने कुऱ्हाडीने झाड तोडण्याची कल्पना सुचवली पण कुणीही यासाठी पुढे आले नाही. हास्यास्पद म्हणजे एकाने बंदूक आणत त्यावर नेम धरून गोळी मारण्याचाही प्रयत्न केला. पण कोणताही नेम त्यावर लागत नव्हता आणि दुसरीकडे बॅट्समन धावून रन काढतच होते.


काही वेळानंतर बंदूकीच्या गोळीचा नेम लागल्याने बॉल खाली आला. पण तो खाली पडण्याआधी कुणीही कॅच करू शकलं नाही. तोपर्यंत या दोन खेळाडूंनी धावून 286 धावा काढल्या होत्या.