IPL 2021 : 14.25 कोटी रुपयांना विकल्या गेलेल्या मॅक्सवेलला वॉर्नरने केलं ट्रोल!
आयपीएल 2021 च्या लिलावात (IPL Auction 2021) 14.25 कोटी रुपयांना विकल्या गेलेल्या ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) ला त्याच्या ऑस्ट्रेलियाच्या टीममधला सहकारी डेव्हिड वॉर्नर (David Warner)ने ट्रोल केलं आहे.


आयपीएल 2021 च्या लिलावात 14.25 कोटी रुपयांना विकल्या गेलेल्या ग्लेन मॅक्सवेलला त्याच्या ऑस्ट्रेलियाच्या टीममधला सहकारी डेव्हिड वॉर्नरने ट्रोल केलं आहे. मॅक्सवेल मागच्या मोसमात अपयशी ठरल्यानंतरही त्याला एवढी रक्कम मिळाल्यामुळे वॉर्नर हैराण झाला आहे.


ऑस्ट्रेलियाचा ओपनर डेव्हिड वॉर्नर फॉक्स स्पोर्ट्सशी बोलताना म्हणाला, 'आयपीएल लिलावात मॅक्सवेलसाठी गोष्टी खराब ठरल्या नाहीत. एक टीम तुम्हाला रिलीज करते आणि दुसरी टीम तुम्हाला आधीपेक्षा जास्त किंमतीला विकत घेते, हे हैराण करणारं आहे.' (David Warner Instagram)


फक्त वॉर्नरच नाह तर ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू मार्क वॉ यानेही मॅक्सेवेलवर निशाणा साधला आहे. मागच्या मोसमात मॅक्सवेलची कामगिरी निराशाजनक होती, पण तरीही तो एवढ्या किंमतीला विकला गेला, हे पाहून मी हैराण झालो, असं मार्क वॉ म्हणाला. (Photo- Glenn Maxwell Instagram)